Advertisement
महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री दिलीपरावजी गायकवाड यांचा जाहीर सत्कारउमरगा: महाराष्ट्र शासनाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री दिलीपरावजी गायकवाड यांचा जाहीर सत्कार
बहुजन रयत परिषद संघटनेच्यावतीने करण्यात आला.
यावेळी बहुजन रयत परिषदेची उमरगा तालुका आढावा बैठक
बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री प्रा.मा.लक्ष्मीरावजी ढोबळे साहेब व बहुजन रयत परिषद प्रदेशाध्यक्ष अँड कोमल ताई साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली
मूकबधिर विद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उमरगा तालुका बहुजन रयत परिषद संघटनेची कार्यकारणी व शहर कार्यकारणीही जाहीर करण्यात आली.
बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर शिरसागर व बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, जिल्हाध्यक्ष योगेश यडोळे यांच्या हस्ते पुढील प्रमाणे निवडी करण्यात आल्या. तालुका अध्यक्षपदी दीपक कांबळे, शहराध्यक्षपदी इरफान शेख, महिला शहराध्यक्षपदी सौ. लक्ष्मी ताई वाघमारे, शहर उपाध्यक्षपदी महेश शिंदे, शहर संघटक पदी रिहान शेख, उमरगा शहर प्रसिद्धीप्रमुख पदी वसीम बागवान, शहर सचिव पदी प्रदीप तोरडकर, सहसचिव पदी राहील शेख यानुसार निवडी करण्यात आल्या. यावेळी मूकबधिर विद्यालय उमरगाचे संस्थापक अध्यक्ष अँड. बी.आर. कलवले, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश सुरवसे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर बनसोडे, शिक्षक वैजनाथ मोरे, यादव,शिंदे, मीना धावरे, उमरगा महिला तालुका मीनाक्षी गायकवाड, गप्पार सौदागर,सोपान गायकवाड,मुनाफ पटेल, सलमान शेख, आयान अर्जुनदीन बागवान यांच्यासह समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.