Advertisement
धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार
मुंबई : भारतीय जनता पार्टीला धक्का देण्याचं शरद पवार गटाने जवळपास निश्चित केलं आहे. आपल्या न घोषित केलेल्या एकमेव माढा मतदार संघ जागेवर आयात उमेदवार उभा करण्याची तयारी शरद पवार गटाने केली आहे. भाजपाचे सदस्य असलेल्या मोहिते पाटील घराण्यातून बंडखोरी जवळपास निश्चित मानली जात आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. आकलुजमधील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मोहिते-पाटील कुटुंबातून कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलं आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार असून देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील ही बंडखोरी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये फडणवीसांना फारसं यश आल्याचं दिसत नाही. धैर्यशील पाटील यांनी बंडखोरी करायचं ठरवलंय अशी माहिती समोर आली आहे.
