#

Advertisement

Wednesday, April 10, 2024, April 10, 2024 WIB
Last Updated 2024-04-10T10:49:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न ?

Advertisement

भीषण अपघातानंतर काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
भांडारा : भंडारा जिल्ह्यातील कारदा गावाजवळ परतीच्या वाटेवर असतानाच नाना पटोले यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.  पटोले यांच्या कारला धडक देत चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकनं केला असून, ही गंभीर घटना असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलं. भाजपकडून पटोलेंचा घातपात करण्याचा डाव आरोप करणारं ट्विट लोंढे यांनी केलं आहे. 
अपघात झाला तिथं सध्या रस्त्याचं बांधकाम सुरु असल्यामुळं तिथं वाहनांचा वेग अतिशय कमी असतो. त्यातही नाना पटोले यांची कार तिथं उभी होती आणि त्या कारला ट्रकनं मागून धडक दिली. बरं ही धडक एकाच कारला लागल्यामुळं कुठंतरी शंका उपस्थित होत आहे, असं माध्यमांशी संवाद साधताना या अपघाताची चौकशी करण्यात यावी ही मागणी लोंढे यांनी केली. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पटोले यांची सुरक्षा सरकार बदलल्यानंतर काढण्यात आली, किंबहुना प्रत्येक काँग्रेस नेत्याची सुरक्षा कमी करण्यात आली त्यामुळं इथं शंकेला वाव मिळत असल्याचं म्हणत अतुल लोंढे यांनी पुन्हा एकदा अपघाताचा संदर्भ दिला.