Advertisement
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सतेत्त आल्यास भारत जगात शक्तिशाली बनेल या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय, असे खळबळजनक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. गुहागरमध्ये महायुतीची सभा पार पडली त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. यावेळी मधुकर चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
कमळ हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास आहे. पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेऊन कामाला लागा. आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवाय, अनंत गीते तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करताय? तुमचे नेतृत्व उध्दव ठाकरे हे लाचार आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यात कोणासमोर झुकले नाहीत. पण उद्धव ठाकरे तुम्ही औरंगजेबासमोर झुकलात. सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर झुकलात, अशा शब्दात चव्हाणांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
