#

Advertisement

Saturday, April 13, 2024, April 13, 2024 WIB
Last Updated 2024-04-13T11:12:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपची काँग्रेससारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही !

Advertisement

माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी नेत्यांना सुनावले खडेबोल 

सांगली : विश्वासात घेऊन काम नाही केले,तर काँग्रेसची जी अवस्था आहे, तशी भाजपाची व्हायला वेळ लागणार नाही,अशा शब्दात भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी भाजपाच्या मंत्री सुरेश खाडे यांच्यासह नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
सांगली लोकसभा निवडणुक निमित्ताने पलूस येथे आयोजित बूथ संम्मेलन कार्यक्रमात ते बोलत होते.  लोकसभेसाठी मी सुद्धा मागणी केली होती. पण आम्हाला बोलवून सांगायला हवं होतं या कारणासाठी तुम्हाला तिकीट देणार नाही. आम्हाला काहीच अडचण नव्हती आणि पक्षावर आमचा आजही राग नाही. पण विश्वासात घेऊन कुणी काम नाही केलं तर काँग्रेसची जशी अवस्था आहे तशी आपली व्हायला वेळ लागणार नाही, असे पृथ्वीराज देखमुख म्हणाले.
पृथ्वीराज देशमुख हे माजी आमदार आणि माजी सांगली जिल्हाध्यक्ष आहेत. पृथ्वीराज देशमुख हेसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी पक्षाकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्याने सांगली भाजपात वातावरण आधीच तापलं होतं. अशातच देशमुख यांनी पक्षाच्या लोकांवर जोरदार टीका केली.
पृथ्वीराज देशमुख यांनी सांगली लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यावर देखील आगपाखड केली आहे. पलूस मतदार संघात पक्षाचा कार्यक्रम करून,आमचा कार्यक्रम करून परत निवडणुकीला उभा राहणार आणि आम्ही पक्ष म्हणून मत देणार. आता परत पाच वर्ष तेच करणार असाल तर आम्हाला यावर गांभीर्याने विचार करावा लागेल, अशा शब्दात खासदार संजयकाका पाटील यांच्यावर पृथ्वीराज देशमुख यांच्यावर निशाणा साधला.