#

Advertisement

Monday, April 1, 2024, April 01, 2024 WIB
Last Updated 2024-04-01T11:47:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धाराशिवमध्ये दिर-भावजय लढत !

Advertisement

भाजप आमदाराची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार
धाराशिव : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिवची जागा मिळाली आहे. मात्र या जागेवरुन भाजप आमदाराची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार आहे. धाराशिवमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे धाराशिवमध्ये लोकसभेसाठी राष्ट्रवादीत हा मोठा पक्षप्रवेश होणार आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात धाराशिवमध्ये लोकसभेच्या उमेदवारीसंदर्भात नाट्यमय घडामोडी घडणार आहे. अर्चना पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राणा जगजितसिंह पाटील मात्र भाजपमध्येच राहणार आहेत. अशातच धाराशिव लोकसभेसाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले निंबाळकर आणि पाटील कुटंबियांमध्ये सामना रंगणार आहे.