#

Advertisement

Tuesday, April 23, 2024, April 23, 2024 WIB
Last Updated 2024-04-23T12:14:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महायुती, मविआत 'या' जागांचा तिढा अजूनही सुटेना

Advertisement

मुंबई : महायुतीत अजूनही 7 लोकसभा मतदारसंघांचा तिढा सुटलेला नाही, तर मविआत मुंबईतील दोन जागांचा वाद कायम आहे. या सर्व मतदारसंघांसाठी पाचव्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मतदान होतंय.. तांत्रिकदृष्ट्या मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला बराच वेळ आहे. त्यामुळे वाटाघाटींसाठी राजकीय पक्षांच हायकमांड वेळ घेत आहे. मात्र, याचा उलट परिणाम असा होतोय की इच्छुक उमेदवारांचं टेन्शन वाढल आहे. कारण उमेदवार ठरत नाही तोपर्यंत प्रचारात उमेदवाराचा चेहरा घेऊन प्रचार करता येत नाही. ना सभा घेता येतात ना प्रचार फेरी काढता येतात ना प्रचारपत्रकं छापता येतात. साहजिकच  प्रचाराचा कालावधी कमी होतोय. त्यामुळे महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील इच्छुकांची डोकेदुखी वाढली आहे.
पाचव्या टप्प्यातील या सर्व मतदारसंघात 18 मेपर्यंत प्रचार करता येणार आहे. 3 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. आयत्यावेळी उमेदवारी जाहीर झाल्यास प्रत्यक्ष प्रचाराला 20 ते 22 दिवसच मिळू शकतात. एका लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ पकडले तरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी जास्तीत जास्त 3-4 दिवस मिळतील. त्यामुळे इच्छुकांचं टेन्शन वाढल आहे. 

महायुतीत या जागांवरील तिढा कायम
मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, पालघर, कल्याण , नाशिक 

मविआचा या जागांवरील तिढा कायम
मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर