Advertisement
अर्ज मागे घेतल्यानंतर प्रमोद गायकवाड यांची टीका
सोलापूर : सोलापुरात भाजपचे पहिले खासदार दारू पिण्यात गेले, दुसरे खासदार मठात बसण्यात गेले, तिसरा आता दिलेला उमेदवार शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतो आणि त्याचे वेगळेच उद्योग धंदे आहेत. अशापासून सोलापूरकरांनी सावधान राहावे आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासोबत राहावे असे आवाहन, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वांचे लक्ष लागलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गायकवाड यांनी आपला अपक्ष भरलेला अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे तसेच माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासोबत येऊन गायकवाड यांनी आपली माघार घेतली. यावेळी अर्ज माघारीनंतर लक्षवेधी प्रतिनिधीशी बोलताना गायकवाड म्हणाले की,
देशाचे संविधान धोक्यात आहे ते वाचवण्यासाठी आपण अर्ज माघार घेतला आहे, आपण अर्ज मागे घेतला असला तरी निवडणुकीच्या कामात सक्रिय राहणार आहे.
दरम्यान, गायकवाड यांनी माघार घेतली असल्याने त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होणार आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची हक्काची मत ही काँग्रेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मिळतील, त्यामुळे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यापुढे आव्हान असणार आहे.
