Advertisement
मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचं जागावाटप अखेर जाहीर झालं आहे. काँग्रेस 17, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21 जागांवर लढणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटील या नेत्यांनी मविआचं जागावाटप जाहीर केलं. मविआच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व नेत्यांची शिवलयात बैठक झाली. संयुक्त प्रचार सभांचे नियोजन, प्रचार रणनिती यावर बैठकीत चर्चा झाली. मविआतील इतर घटक पक्षांचे नेतेही या बैठकीत सहभागी झाले होते.
मविआचा जागा वाटप फॉर्म्युला :
काँग्रेस : नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, नाणेर, जालना, मुंबई उत्तर-मध्य, उत्तर मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक.
राष्ट्रवादी शरद पवार गट : बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर-दक्षिण, बीड
शिवसेना ठाकरे गट : जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातगलंगणे, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, उत्तर-पश्चिम मुंबई, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य
