Advertisement
मविआत जागावाटपावरुन नाराजीनाट्य
मुंबई : सांगलीची जागा ठाकरेंकडे गेल्यानंतर जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. विश्वजीत कदम, विशाल पाटील आणि विक्रम सावंत नॉट रिचेबल आहेत तर मुंबईत समाधानकारक जागा न मिळाल्यानं वर्षा गायकवाड नाराज झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची बुधवारी बैठक होणार आहे. विश्वजित कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील अशा प्रमुख नेत्यांची उद्या बैठक होणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर विशाल पाटील अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.. उद्या 11 वाजता ही बैठक होणार आहे.
