#

Advertisement

Friday, April 19, 2024, April 19, 2024 WIB
Last Updated 2024-04-19T12:36:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

निधी पाहिजे तर कचा-कचा बटण दाबा... अजित पवार यांच्यावर कारवाई होणार?

Advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निधी पाहिजे तर कचा-कचा बटण दाबा, आम्हाला मतदान करा नाहीतर निधीबाबत हात आखडता घ्यावा लागेल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
इंदापुरात व्यापारी वकील संघटनेच्या बैठकीमध्ये बोलताना पवार म्हणाले होते की, आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही. मात्र तुम्ही मतदान करायला गेल्यावर मशीनमध्ये देखील आपल्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबा कचा-कचा म्हणजे मला सुध्दा निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा पण हात आकडता येईल.