#

Advertisement

Friday, April 19, 2024, April 19, 2024 WIB
Last Updated 2024-04-19T12:21:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

प्रणिती शिंदे कोट्यवधीची मालकीण : उमेदवारी अर्ज दाखल

Advertisement

सोलापूर : लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.सोलापूर लोकसभे मविआच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदेंनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे हे जाहीर केले आहे. प्रणिती शिंदे या कोट्यवधीच्या मालकीण आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावे 2019 मध्ये चार कोटी 79 लाख 27 हजार 210 रुपयांची मालमत्ता होती. तर,  2024 मध्ये त्यांच्या नावे सहा कोटी 60 लाख 70 हजार 402 रुपयांची मालमत्ता, संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते. सध्या प्रणिती शिंदे  यांच्याकडे 6 कोटी 60 लाख 70 हजार रुपयांची मालमत्ता आहे.  2019 च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत पाच वर्षांत एक कोटी 81 लाख 42 हजार रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आले. विशेष बाब म्हणजे आपल्या नावे एकही दुचाकी, चारचाकी नसल्याचंही त्यांनी त्यात नमूद केले आहे.