#

Advertisement

Tuesday, April 30, 2024, April 30, 2024 WIB
Last Updated 2024-04-30T12:38:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राम सातपुतेंना प्रणिती शिंदे यांनी भरला दम

Advertisement

सोलापूरची एकी बिघडवाल तर  खबरदार......
सोलापूर : सोलापूरची निवडणूक हातातून गेल्याचे समजल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांचे फोन कॉल सुरू झाले आहेत. तुमच्या मागे इडी लावीन, तुमचा कारखाना सिल करेन अशा धमक्या नेत्यांना देण्यात येत आहेत. कुणी बाहेरचा येऊन सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतो आहे, शेतकरी हैराण आहे, सोलापूरकर विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत म्हणून आता समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न होत आहे, खबरदार जर सोलापूरची एकी बिघडवली तर गाठ माझ्याशी आहे. सोलापूर हे सर्वधर्मसमभावाचे आणि क्रांतिकारी शहर आहे, या शब्दात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचे नाव न घेता थेट दम भरला.
हाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रणिती बोलत होत्या. सोलापुरात पंतप्रधानांच्या सभेला फक्त 20 हजार लोक, आमच्या गड्डा यात्रेला यापेक्षा जास्त लोक असतात, अशी खिल्ली उडवत सोलापूर जिल्हा दुष्काळ मुक्त करणारच, सोलापूर खड्डे मुक्त करणार, आय टी पार्क आणणारच, सोलापुरात विमान सेवा सुरू करणार अशी प्रतिज्ञा प्रणिती शिंदे यांनी केली.