#

Advertisement

Tuesday, April 30, 2024, April 30, 2024 WIB
Last Updated 2024-04-30T12:16:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन !

Advertisement

मोदींना शरद पवारांचं सडेतोड प्रत्युत्तर 
पुणे : पुण्यातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे, असं वक्तव्य  मोदी यांनी केल होत. यावर आता स्वत: शरद पवार यांनी उत्तर दिल आहे. होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन' असं शरद पवारांनी म्हटल आहे.
पंतप्रधान काल म्हणाले ईडीचा मी एक टक्का ही वापर करत नाही. जनतेचा ज्यांच्यावर विश्वास त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय. माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्या बद्दल काय बोलतात. एक आत्मा भटकत आहे असं तुम्ही म्हणाले, त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, अस मोदी म्हणाले. पण हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. हे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही, असं सडेतोड उत्तर शरद पवार यांनी दिल\आहे.