Advertisement
सोलापुर : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस पडला आहे. सोलापुरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रचार कोलमडला आहे. राज्यातील बारा जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचं देखील हवामान विषयक अंदाजात नमूद करण्यात आल आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस पडला आहे. काही गावांमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बसलेगाव ते गरोळगी या दोन गावाची वाहतूक बंद झाली आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
