Advertisement
दि. २४ तारखेला राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन
सिलापुर: लोकसभा निवडणुकीत वेगवान घडामोडी घडत असताना राज्यात आपले स्वतंत्र अस्तित्व असलेली बहुजन रयत परिषद यापासून अलिप्त राहिलेली आहे. सध्याची राज्यभरातील स्थिती दोलायमान आहे, अशा स्थितीत योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे, याकरिता परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेश अध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांच्या उपस्थितत योग्य ती भूमिका ठरविण्यात येणार आहे, असे प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर यांनी सांगितले.
याबाबत ईश्वर क्षिरसागर म्हणाले की, ॲड. कोमलताई यांना भाजप कडून लोकसभा उमेदवारी देण्यात येणार होती तसेच भाजप प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांना कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही, अशाही स्थितीत बहुजन रयत परिषदेने कोणतेही चुकीची भूमिका घेतली नाही. मात्र, परिषदेचे स्वतंत्र अस्तित्व असतानाही याकडे काही राजकीय मंडळी दुर्लक्ष करीत असतील तर त्यांना आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, याशिवाय आगामी काळात होणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकाबाबत आपली भूमिकाही ठरवायची आहे,
याच कारणातून सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे क्षिरसागर यांनी स्पष्ट केले.
बहुजन रयत परिषद ही संघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रमाणे चालणारी रजिस्टर संघटना आहे.
बहुजन रयत परिषद या संघटनेने कोणत्याच पक्षाला आजपर्यंत पाठिंबा दिलेला नाही. या संघटनेच्या बैठकीत जो काही निर्णय आहे. त्यानुसार पुढील भूमिका संघटनेचया प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे- ढोबळे घेणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व पदाधिकऱ्यांनी दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी. हैद्रा तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर .या ठिकाणी होणाऱ्या बैठकीस राज्यातील बहुजन रयत परिषदच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सर्व राजकीय पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी. दुपारी 1 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन ही ईश्वर क्षिरसागर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 98 22 71 99 71 या क्रमांकावर संपर्क साधावा.
