#

Advertisement

Wednesday, May 29, 2024, May 29, 2024 WIB
Last Updated 2024-05-29T11:56:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ससून रुग्णालयातील 3 जणांचं निलंबन

Advertisement

ब्लड सॅम्पल फेरफार करणं भोवलं 
पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळसह शिपाई अतुल घटकांबळेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अजय तावरेंच्या सांगण्यावरून हरनोळ आणि घटकांबळेंनं आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचं उघडकीस आल. पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचा कटाचा मास्टरमाईंड ससूनचा डॉक्टर तावरेच असल्याचं समोर आल आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालने अजय तावरेशी तब्बल 2 तासांत 14 वेळा फोन केल्याचं उघड झाल आहे. 19 मे रोजी म्हणजेच अपघाताच्या दिवशी सकाळी 9 ते 11 च्या दरम्यान एकमेकांना व्हॉट्सअॅप आणि फेसटाईमच्या माध्यमातून कॉलिंग केल्याचं समोर आलं आहे. आता पोलीस या दोघांमधील मध्यस्ती कोण होता? याचा शोध घेत आहेत.

कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा संशय
गुन्ह्याचा तपास भरकटवण्याच्या उद्देशाने डॉक्टर तावरेनेच ब्लडचे सॅम्पल बदलण्याचा कट रचला होता. त्यासाठी ससूनमधील डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि कर्मचारी अतुल घटकांबळे यांना डॉक्टर तावरेनेच 3 लाख रुपये दिल्याचं समोर आलंय. या सर्व प्रकरणात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.