#

Advertisement

Wednesday, May 29, 2024, May 29, 2024 WIB
Last Updated 2024-05-29T12:07:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

डॉ. तावरे दारु आणायला सांगायचे !

Advertisement

ससूनच्या वॉर्ड बॉयचे गंभीर आरोप
ससूनचे डॉक्टर अजय तावरेच्या अडचणीत वाढ झाली आहे. ससून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी चौकशी समिती समोर अजय तावरेची तक्रार केली आहे. अजय तावरे कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दारू आणायला लावत होता. वडिलांच्या नावाने मला ससूनमध्ये काम करायला लावले. माझ्यासारख्या अपंगाला तावरेने त्रास दिला. सर्व शासनाकडे मी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. नाईट ड्युटीला असताना अजय चंदनवाले व अजय तावरे दारू आणायला सांगत होते. चौकशी समिती समोर वॉर्ड बॉयने अजय तावरेचा तक्रारींचा पाढाच वाचला आहे. मला न्याय द्या नाहीतर मी आत्मदहन करेल असे ससूचे वॉर्डबॉय नितीन सोनवणे यांनी म्हटले आहे.

ससून चौकशी समितीने आज ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. अहवाल तयार करून राज्य सरकारला तो सादर केला जाणार आहे. ड्रिक अँड ड्राईव्ह प्रकरणात ससूनचे दोन डॉक्टर अटकेत आहे. ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार प्रकरणी ससूनच्या डॉक्टरांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.