Advertisement
शिवानी आग्रवालचीही होणार चौकशी
पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत असतानाच आता या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाची आई शिवानी आग्रवालचीही चौकशी होणार आहे. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनी पैसे घेऊन रक्ताचे नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामध्ये चालकाला धमकावून पुरावा नष्ट करण्याबरोबरच ससूनमधील डॉक्टरांना पैसे देऊन रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. याच प्रकरणी आता अल्पवयीन मुलाच्या आईचं काय म्हणणं आहे, हे पोलिसांना जाणून घ्यायचं आहे. या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाची आई सुद्धा सहभागी आहे का? गुन्हा लपवण्यात तिचाही सहभाग होता का? याचा पोलीस तपास करत आहे. तपासासाठी पोलिसांनी शिवानी अग्रवालला फोन केला होता. मात्र तिचा मोबाईल बंद असून ती नॉट रिचेबल आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
