Advertisement
आमदार निलेश लंके याना अजित पवार यांचा थेट इशारा
पारनेर : महाराष्ट्रात माझ्या नादी लग्नाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केलाय. निलेश लंके 'तू किस झाड की पत्ती है' असं म्हणत अजित पवार यांनी महविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना थेट इशारा दिली आहे.
अहिल्यानगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचार्थ अजित पवार बोलत होते. महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला. मागच्या वेळी निलेशला तिकीट देऊन चूक झाली. अगोदर हा गरीब वाटला. नंतर समजलं हा गुंड पाठवून लोकांना त्रास देतो. कलेक्टरला ये कलेक्टर म्हणतो, पोलिसांचा बाप बनतो, निलेश बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्याचा मी हेडमास्तर आहे. तू आता आमदार नसुन, कॉमनमॅन झालाय. तुझा कंड कसा जिरवायचा, हे मला चांगलं माहीत आहे. असं म्हणत अजित पवार यांनी निलेश लंके यांना सुनावलं आहे.
आपल्या भाषणात अजित पवार यांनी निलेश लंके यांना चांगलच सुनावलं आहे. निलेश माझ्या नादी लागू नकोस महाराष्ट्रात जे कोणी माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय, मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्यास तर मी तुझ्या मागे लागेन अशा शब्दात अजित पवार यांनी इशारा दिला आहे.
