Advertisement
तुरुंगाबाहेर येताच मोदी सरकारवर गरजले
दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीआधी केजरीवाल बाहेर आल्याने आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीमध्ये 25 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या 6 जागा आहेत. तर पंजाबमध्ये 13 जागांसाठी 1 जूनला मतदान होणार आहे. हे मतदान होईपर्यंत केजरीवाल बाहेर असणार आहेत. देशात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत. त्यादरम्यान केजरीवाल तुरुंगातच होते. तिहार तुरुंगातून बाहेर आलेल्या केजरीवाल यांच्या स्वागतासाठी आपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देशाता आता हुकुमशाहीचे दिवस संपणार आहेत, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
21 मार्चला अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. तर 10 मे रोजी केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर झालाय. अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय. 2 जून रोजी अरविंद केजरीवाल यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण करावं लागणार आहे. मात्र आता दिल्लीच्या निवडणुकीआधी केजरीवाल बाहेर आल्याने आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडीसाठीसुद्धा जमेची बाजू ठरलीय. अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मोकळीक दिली आहे
