#

Advertisement

Thursday, May 16, 2024, May 16, 2024 WIB
Last Updated 2024-05-16T11:44:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजप च्या उमेदवार कंगना कोट्यवधींची मालकीन

Advertisement

हिमाचल प्रदेश : लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. त्याचवेळी देशातील इतर टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात बॉलीवूड स्टार कंगना राणावत उतरली आहे. कंगनाने मंगळवारी तिने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत संपत्तीचे माहिती देणारे प्रतिज्ञापत्र तिने जोडले आहे.
कंगना राणावत मुळची हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातीलच आहे. तिचा जन्म 23 मार्च 1987 रोजी मंडी जिल्ह्यात झाला. कंगना केवळ बारावी उत्तीर्ण आहे. तिने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार तिच्याकडे 90 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. तिच्याकडे दोन लाखांची रोकड आहे. सर्व बँक खाते, शेअर, ज्वेलरी मिळून जंगम मालमत्ता 28 कोटी 73 लाख 44 हजार 239 रुपये आहे. स्थावर मालमत्ता 62 कोटी 92 लाख 87 हजार रुपये आहे. तिच्यावर 17 कोटी 38 लाख रुपये कर्जसुद्धा आहे. 6 किलो 700 ग्रॅम सोने आणि दागिने आहेत. या सोन्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. तसेच 60 किलो चांदी आहे. चांदीची किंमत 50 लाख रुपये आहे. तिच्याकडे कोट्यवधी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने आहेत. त्यांची किंमत 3 कोटींहून अधिक आहे.