Advertisement
शंभूराज देसाई यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट
मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांनी आगामी काळातील राजकीय घडामोडींबाबत सर्वात मोठा दावा केला आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता शेवटचं पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे ला होणार आहे. यानंतर 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. कारण महाविकास आघाडीतील बडे नेते महायुतीत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत आम्हाला आतून मदत करण्यात आल्याचा खळबळजनक दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्वीटवर भाष्य करताना शंभूराज देसाई यांनी याबाबतचा मोठा दावा केला. अनेक नेत्यांनी आम्हाला या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे मदत केली आहे. निकालानंतर तुम्हाला याची प्रचीती येईल, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला. अनेक लोकांनी आतून आम्हाला मदत केली आहे. त्या गटातील अनेक लोकांनी आम्हाला मदत केली आहे. आम्ही आज त्यांची नावे सांगणार नाही. पण 4 जूननंतर महायुतीमध्ये लोंढा येईल. महाविकास आघाडीमधील अनेकांनी आम्हाला मदत केली. आता आम्ही त्यांची नावे घेऊ शकत नाही, असंही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं.
