#

Advertisement

Monday, May 20, 2024, May 20, 2024 WIB
Last Updated 2024-05-20T12:34:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बड्या व्यावसायिकाच्या मुलाला सशर्त जामीन, अटी बघा काय?

Advertisement

पुण्यात दोन जणांचा जीव घेणारा अपघात

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघात प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघातामधील आरोपी असलेल्या वेदांत अग्रवाल याला जामीन मंजुर झाला आहे. बड्या उद्योजकाच मुलगा असलेला वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याने अटी शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास हा  घडलेला अपघात इतका भीषण होता की जागीच दोघांचा मृत्यू झाला. ज्या अटींवर त्याला जामीन दिला आहे त्या अटींमध्ये 15 दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबलसोबत वाहतूक नियंत्रण करावं लागणार आहे.
वेदांत अग्रवालला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबल सोबत चौकात उभे वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. वेदांत अग्रवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत. वेदांत अग्रवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागणार या अटींवर जामीन मंजुर करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यातील कोरेगाव पार्क येथून टू-व्हीलवर जाणाऱ्या एका कपलला स्पोर्ट्स कारने जोरात धडक दिली. ह धडक इतकी जोरात होती की तरूणी गाडीवरून 10 फूट हवेत उडाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर गाडी चावणाऱ्या तरूणाने उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला. दोघेही राजस्थानचे असून अनीस दुधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.