Advertisement
राज्यातील बड्या नेत्याने केला गौप्यस्फोट
सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची चौकशी लागलेली आहे. हे पण भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक झाली की सुशीलकुमार शिंदे भाजपवासी होतील असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
सोलापूरमध्ये जाहीर सभेत ते बोलत होते. सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण पण आंबेडकरांनी दिले आहे. सोलापूरचे कॉग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची चौकशी लागेलेली आहे. त्यामुळे ते भाजपत जातील. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे यांची चौकशी थांबवलेली आहे. ही चौकशी थांबवण्यासाठी शिंदे भाजपामध्ये जातील. संविधान बदलेल अमुक बदलेल याच्याशी त्यांना काही देणे घेणे नाही.त्यांनी जमवलेली माया वाचवणे एवढेच त्यांचे टार्गेट आहे, अशी खोचक टीका पण आंबेडकरांनी केली.
