#

Advertisement

Tuesday, May 21, 2024, May 21, 2024 WIB
Last Updated 2024-05-21T12:56:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

Advertisement

 छत्रपती संभाजी नगरची तनिशा बोरमणीकर राज्यातून पहिली

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. यात छत्रपती संभाजी नगरची तनिशा बोरमणीकर राज्यातून पहिली आली आहे. तिला शंभर टक्के गुण मिळाले आहेत.
बारावीत विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7,60,46 विद्यार्थी,  कला शाखेसाठी 3, 81,226 आणि वाणिज्य शाखेसाठी 3, 29,905 विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. व्यावसायिक अभ्यासक्रमातील 37,226 आणि आटीआयमधील 4750 विद्यार्थ्यांचाही निकाल यावेळी जाहीर झाला.
संभाजीनगरची तनिशा बोरमणीकर या विद्यार्थीनीला बारावीत शंभर टक्के गुण मिळाले आहेत. पैकीच्या पैकी गुण मिळवणारी तनिशा कॉमर्सची विद्यार्थीनी आहे. बारावीत शंभर टक्के निकाल लागेल असे मला अजिबात अपेक्षित नव्हतं. 95 टक्के गुण मिळतील असं वाटल होतं पण शंभर टक्के गुण मिळतील असं वाटलं नव्हत. यामुळे खूप आनंदी असल्याचे तनिशा म्हणाली.  

निकालाची विभागनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे 

कोकण 97.51 %
लातूर  92.36 %
नाशिक 94.71 %
अमरावती 93.00 %
कोल्हापूर 94.24 %
मुंबई 91.95 %
छत्रपती संभाजीनगर 94.08 %
नागपूर 92.12 %
पुणे 94.44 %