#

Advertisement

Tuesday, May 21, 2024, May 21, 2024 WIB
Last Updated 2024-05-21T13:19:00Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बापलेकीचं 'ते' संभाषण ठरलं शेवटचं : अश्विनीवर अंत्यसंस्कार

Advertisement

जबलपूर : पुण्यातील व्यावसायिक वडिलांच्या लेकाने आपल्या 2 कोटींच्या पोर्श गाडीखाली दोघांना चिरडलं. या घटनेत मृत पावलेली अश्विनी कोस्टा आणि अनीश दोघे मूळचे जबलपूरचे आहेत. अश्विनी आपल्या करिअरसाठी मध्य प्रदेशच्या जबलपूरमधून पुण्यात आली होती. आयटी इंजिनीअर असलेली अश्विनी पुण्यात जॉब करत होती. अश्विनी कोस्टा आता पंचतत्वात विलीन झाली आहे. पण तिच्या परिवाराकडे आता फक्त तिच्या आठवणीच राहिल्या आहेत. अश्विनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ वडिलांवर आली.
अश्विनीचे वडिल सुरेश कोस्टा यांच्या रागाला पारावर उरला नाहीय. एका धनदांडग्याच्या लेकामुळे माझी 24 वर्षांची लेक या जगात नाहीय, असे सांगताना त्यांचा कंठ दाटून येतो आहे. अश्विनीला एक भाऊ आहे. दोघेही मुलं इंजिनीअर आहेत. त्यांचे आई वडिल जबलपूरमध्ये राहतात. रात्री 10 वाजता अश्विनीचे आपल्या वडिलांसोबत बोलणं झालं होतं. मी जेवायला जात आहे, असे ती म्हणाली. यानंतर मुलीसोबत काही बोलणं झालं नसल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.  मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांना पौर्शे चालक, पोलीस प्रशासनावरील राग अनावर झाला. माझी पुतणी साधी होती. ती शिक्षणातदेखील हुशार होती. मागच्या वाढदिवसाला ती जबलपूरमध्ये आली होती. काही दिवस राहिल्यानंतर ती पुण्याला परतली. पण आता ती या जगात नाहीय, असे तिचे काका अयोध्या कास्टा यांनी सांगितले.