#

Advertisement

Monday, May 20, 2024, May 20, 2024 WIB
Last Updated 2024-05-20T13:03:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राम सातपुते आचारसंहिता भंग तक्रारीची पुनः चौकशी करा

Advertisement

निवडणूक आयोगाचे आदेश 
सोलापूर : लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी प्रचार करत असताना आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा अहवाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. आयोगाने याप्रकरणी पुनचौकशी करुन अहवाल पुन्हा सादर करण्याचे लोकसभा निवडणूक काळात भाजप नेते देवेंद्र कोठे यांनीही सोलापुरात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यातही आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे दिसून आल्याने त्यांच्याविरुध्दही अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून आयोगास पुन्हा काय अहवाल पाठविण्यात येणार व आ. सातपुते यांच्याविरुध्द कारवाई होईल का? याचीही उत्सुकता मतदारांना आहे.