#

Advertisement

Monday, May 20, 2024, May 20, 2024 WIB
Last Updated 2024-05-20T12:56:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात काँग्रेसला "लीड"चे टेन्शन

Advertisement

अक्कलकोट व शहर उत्तरमध्ये लीड मिळणार का  
सोलापुर : काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून अक्कलकोट तालुक्यात दहा हजार आणि शहर उत्तर मध्ये 25000 असे लीड अपेक्षित आहे मात्र शहर मध्य, दक्षिण विधानसभा मतदारसंघ, मोहोळ, पंढरपूर या चारही मतदारसंघात झालेले मतदान मुस्लिम समाज, मराठा समाज तसेच आंबेडकरी समाजाने काँग्रेसला केलेल्या मतदानामुळे प्रणिती शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळेल आणि प्रणिती या 25000 लीडने विजयी होतील या आशेवर काँग्रेसचे कार्यकर्ते दिसून येतात मात्र या उलट भाजपच्या कार्यकर्त्यांमधून झालेले मतदान पाहता राम सातपुते किमान एक लाखाच्या फरकाने विजयी होतील अशी अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे.
सोलापूर लोकसभेची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. 2014 आणि 2019 मधील लाट यावेळी पाहायला मिळाली नाही. एकूणच वातावरण पाहता काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या वीस ते पंचवीस हजाराने निवडून येतील असे सर्वत्र बोलले जात आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळेल अशी चर्चा आहे.