Advertisement
नाशिक: उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. नाशिकमधून महायुतीचा उमेदवार निवडताना अनेक उलट-सुलट घडामोडी घडल्या. यानंतर अखेर शिंदे गटाने हेमंत गोडसेंना उमेदवारी जाही केली आणि महायुतीचा नाशिकचा उमेदवार कोण या चर्चेवर पडदा पडला. एकीकडे हा सस्पेन्स संपला असताना आता पुन्हा एकदा नाशिकमधील निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. या नव्या ट्विस्टमुळे नाशिकची थेट लढत होणार नसून इथे पाच उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होईल.
नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. असं असतानाच आज शिवसेनेतील नाराज विजय करंजकर सुद्धा अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात आहे. विजय करंजकर हे आज नाशिकमधून अपक्ष अर्ज दाखल करतील. असं झालं तर उद्धव ठाकरे गटाबरोबरच महायुतीचंही टेन्शन वाढणार आहे. कार विजय करंजकर हे या मतदारसंघातील 2 प्रभावी अपक्ष उमेदवार असतील.
वंचितकडून कोण रिंगणार?
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नाशिकमधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र वाजे यांना उमेदवारी दिल्याने विजय करंजकर नाराज झाले असून ते स्वबळावर अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. विजय करंजकरांना ठाकरेंनी उमेदवारी नाकारल्याने ते महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर आव्हान निर्माण करण्याच्या तयारीत आहेत.
