#

Advertisement

Friday, May 3, 2024, May 03, 2024 WIB
Last Updated 2024-05-03T11:04:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

स्व.अनुराधा ढोबळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात व्याख्यान

Advertisement

 

मंगळवेढा : सावली फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा स्व.अनुराधा लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान आज सायंकाळी सहा वाजता मंगळवेढा येथील शिशुविहार जवळील शाहू मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड कोमल ढोबळे-साळुंखे यांनी दिली.
स्व. सौ. अनुराधा ढोबळे... हे नाव आहे राजकारणाला समाजकारणाची जोड देत कष्टकरी, कामगार, शोषित, वंचित बहुजन समाजाच्या हितासाठी आयुष्यभर झटणारे आदरणीय प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अर्धांगिनीचं. ज्यांनी  साहेबांना भल्या-बुऱ्या काळात भक्कम साथ दिली अन् कुटुंबाला मायेच्या धाग्यानं बांधून ठेवलं एकत्र. हे नाव आहे शाहू परिवारातील हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांना मायेची सावली देणाऱ्या माउलीचं. हे नाव आहे बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वाभिमानानं जगायला शिकवणाऱ्या सावली फाउंडेशनच्या आधारस्तंभाचं..! हे नाव आहे, घरी येणाऱ्या प्रत्येकाला मग तो पक्षाचा कार्यकर्ता असो अगर संघटनेचा प्रत्येकाला पोटभर जेवू घालणाऱ्या अन्नपूर्णेचं!  अशा या मायमाउलीची दि. ३ मे २०२४ रोजी पुण्यतिथी साजरी होत आहे. यानिमित्ताने युवा व्याख्याते मा. वसंत हंकारे यांचे 'आई-बाप समजून घेताना' या विषयावर व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे. शाहू मैदान, शिशुविहार समोर, मंगळवेढा येथे सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड.कोमल ढोबळे-साळुंखे यांनी केले आहे.