#

Advertisement

Friday, May 31, 2024, May 31, 2024 WIB
Last Updated 2024-05-31T12:46:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सेवानिवृती ही संस्थेसाठी नवनिर्मितीची संधी : माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे

Advertisement

मंगळवेढ़ा : संस्थेच्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती नसून माझ्यासाठी किंवा माझ्या संस्थेसाठी नवनिर्मितीची संधी आहे. ज्यायोगे त्यांच्याकडून शालेय सेवानिवृत्तीनंतर मी संस्थेचा वटवृक्ष फुलविन्यासाठी व बहरण्यासाठी त्यांच्या कुशल प्रशासनाचा सदुपयोग करून घेऊ इच्छितो. असे प्रतिपादन माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले, येंद्रव खवे (ता. मंगळवेता) येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे प्राचार्य विश्वंभर काळे व अधीक्षक मल्कू शेख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रमात माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे बोलत होते.
यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत, उद्योजक सुरेश पेपले शाहू शिक्षण संस्थेचे सचिव अॅड  अभिजित ढोबळे, काशिनाथ पाटील, भुजंगराव पाटील, जालिंदर माने, सुरेश पवार, सरपंच संजय पाटील, सिद्राम जाधीर, प्राचार्य चिदानंद माळी इरकर, दादासाहेब वाममारे, महेंद्र शिंदे, सहोरा कदम, राजेंद्र पोतदार, कृष्णदेव चौगुले, बसवराज कोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
ढोबळे म्हणाले की, शाहू शिक्षण संस्थेचा डोलोरा वाढवण्यामध्ये प्राचार्य  विश्वंभर काळे अविभाज्य घटक होते. हे फक्त सेवेतून निवृत झाले परंतु कर्तव्य तत्परता आणि सचोटी है त्यांचे वाखणण्याजोगे गुण आहेत, म्हणून असा कुशल संघटक माझ्या संस्थेला लाभला, त्यामुळे संस्थेच्या नावलौकिकात भर पडली.
प्राचार्य विश्वंभर काळे  म्हणाले, की शाहू शिक्षण संस्थेपथ्ये काम करत असताना आलेले अनुभव व संस्थेने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी दिलेले पाठबळ यामुळे आपण संस्थेचा नावलौकिक वाढवू शकलो, यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्ञानविश्व् या सेवापूर्ती स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले, प्रा. भालबंद काटकर, अरविंद बिराजदार यांची भाषणे झाली. कार्यक्रमासाठी प्रा. भारत पाटील, सचिन कांबळे, सरपंच संजय पाटील व सर्व शिक्षक व शिशकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.