#

Advertisement

Friday, May 31, 2024, May 31, 2024 WIB
Last Updated 2024-05-31T12:25:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे पडणार : चंद्रकांत खैरे

Advertisement

छत्रपती संभाजी नगर : लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे पडणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरे यांच्या या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपले आहेत. मराठवाड्यात महायुतीला एकही जागा मिळणार नाही. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे पडणार आहेत, असा दावा मीडियाशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. निवडणूक निकाल म्हटल्यावर धाकधूक होतेच. शाळेत असताना परीक्षेच्यावेळीही धाकधूक व्हायची. पेपर सोपा गेला की बरं वाटायचं. आताही पेपर सोपा गेला आहे. पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहून चालणार नाही. कारण शेवटी मतदारांच्या हातात कौल आहे, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.