#

Advertisement

Thursday, May 30, 2024, May 30, 2024 WIB
Last Updated 2024-05-30T12:48:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी मोदी करणार का?

Advertisement

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या. त्यांच्या या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सज्ज झाले आहेत. पण, त्यांच्या मार्गात ही चार राज्ये प्रमुख अडसर ठरणारी आहेत. सहा प्रमुख राज्यांमध्ये एकूण 244 जागा आहेत. येथे भाजपची स्पर्धा थेट प्रादेशिक पक्षांशी आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशा या चार राज्यांच्या निकालांवरून लोकसभा निवडणुकीतील बहुमताचा जनादेश आणि निकाल निश्चित केला जाईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करू शकतील का? ही चार राज्ये या ऐतिहासिक घटनेचा निर्णय घेऊ शकतात.
लोकसभा निवडणूक 2024 च्या सहा टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. 1 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व नेते यावेळी 400 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. तर, विरोधी इंडिया आघाडीदेखील आपल्याच विजयाचा दावा करत आहे. देशात सत्ता मिळवण्यासाठी 272 जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांच्या विक्रमाची मोदी बरोबरी करू शकतील का? बहुमताची किल्ली हाती असणारी ती चार महत्वाची राज्ये कोणती अशी चर्चा आता जोर धरू लागली आहेत.
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 2019 मध्ये भाजपने लोकसभेच्या 543 पैकी 303 जागा जिंकल्या. राजकीय नकाशावर नजर टाकल्यास 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाखालील NDA आघाडीच्या विजयाची मूळ कल्पना येते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल, त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करेल की बहुमत गमावेल? देशातील 28 पैकी फक्त चार राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये भाजपला किती जागा मिळतात यावर ते अवलंबून आहे.
तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि तेलंगणा या दक्षिणेकडील चार राज्यांमध्ये भाजपला अजूनही म्हणावा तसा आपला ठसा उमटविता आला नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला 101 जागांपैकी केवळ चार जागा जिंकता आल्या होत्या. आता तीच परंपरा कायम रहाणार की भाजपच्या जागा वाढणार हे महत्वाचे ठरणार आहे. यातील तेलंगणा राज्यात भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजपला कर्नाटक आणि अन्य राज्यांत काही जागा गमवाव्या लागतील. परंतु. काँग्रेससोबत होणाऱ्या थेट लढतीत भाजपला परिणामकारक नुकसान होण्याची तशी शक्यता नाहीच. देशाची सत्ता कुणाकडे सोपविणार याचा निर्णय घेत असतात. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, ओडीसा ही सहा राज्ये महत्वाची भूमिका ठरवितात. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची स्थिती खूप मजबूत आहे. परंतु यावेळी महाराष्ट्र (48 ), पश्चिम बंगाल (42), बिहार (40) आणि ओडिशा (21) याकडे भाजपचे अधिक लक्ष असेल.