#

Advertisement

Friday, May 31, 2024, May 31, 2024 WIB
Last Updated 2024-05-31T11:44:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विठ्ठला मायबापा ! गाभाऱ्यासमोरील दगड काढताच मंदिराचं गूढ वाढलं

Advertisement

पंढरपूर : आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम युद्धपातळीवर सुरू असून नुकतंच मंदिर समितीनं या मंदिराची सुरेख झलक सर्वांपुढे आणली. मंदिर संवर्धनाच्या या कामात नव्यानं करण्यात आलेली सर्व बांधकामं काढत मंदिर पुरातन स्थितीत पुन्हा सर्वांसमोर आणलं जात आहे. पंढरपूरातील मंदिराच्या गाभाऱ्यासमोर सोळ खांबीजवळील हनुमान दरवाजापाशी एक दगड खचलेला आढळला. तो दगड काढून पहिला असता त्या ठिकाणी एक तळघरवजा खोली आढळली. या तळघराच्या निमित्तानं पुरातन काळातील काही माहिती आणि रहस्य समोर येण्याची शक्यता आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरु असताना मंदिराच्या गाभाऱ्यासमोर असणारा एक खचलेला दगड हटवताच तिथं एक तळघर आढळून आलं. सध्या पुरातत्वं विभागाचे अधिकारी या तळघराची पाणी करणार आहेत.  हनुमान दरवाजातून बाहेर पडतो तेव्हा तिथं डाव्या हाताशी असणाऱ्या जागेत गुरुवारी मध्यरात्री काम करत असताना दोन खचलेले दगड आढळले. हे दगड हटवले असता तिथं खालच्या बाजूला जाणाऱ्या पायऱ्या आढळल्या, जिथं हे तळघर असल्याची शक्यता मंदिर प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.