#

Advertisement

Monday, May 6, 2024, May 06, 2024 WIB
Last Updated 2024-05-06T12:15:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सहा महिन्यापूर्वी तुम्ही बहिणीचे कौतुक करत होता !

Advertisement

अजित पवार यांचे सख्ख्ये बंधू श्रीनिवास पवार याची टीका  

बारामती :सहा महिन्यांपूर्वीची वक्तव्य पाहा. त्यावेळी अजितदादा बहिण सुप्रिया हिचे कौतुक करीत होते. आता तुमची बदललेली वाक्य मोबाईलवर फिरत आहेत. सहा महिन्यांमध्ये तुमच्यात झालेला हा बदल लोकांना कळत आहे. लोक सृज्ञ आहेत. ते योग्य निर्णय घेतील. परंतु एक नक्की सांगतो बारामतीकर शरद पवारांचा पाठिशी आहेत. गेली ६० वर्षे ते पवार साहेबांसोबत आहे. ते तुम्हाला दिसून येईल, अशी टीका अजित पवार यांचे सख्ख्ये बंधू श्रीनिवास पवार यांनी केली आहे. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. 
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आता स्वच्छ चारित्र्य असलेल्या लोकांचा पक्ष झाला आहे. या पक्षातील कोणत्या नेत्यावर आरोप नाही. ज्यांच्यावर आरोप होते, ते तिकडे गेले. आता पक्षात स्वच्छ चारित्र्याची लोक राहिली आहे. निवडणुकीत आम्ही आताच प्रचार करत नाही. यापूर्वी प्रचार करत होतो. आमचे गावात आणि मतदार संघात सामाजिक संबंध आहेत. अनेक मित्र आहेत. त्यांच्यापर्यंत आम्ही जात असतो, असे श्रीनिवास पवार यांनी सांगितले.