Advertisement
बारामती मतदार संघात लावली कडक फिल्डींग
बारामती : देशातील काही दौरे तसेच राज्यभरातील सततच्या सभा आणि राज्यव्यापी दौऱ्यांमुळे शरद पवार यांची प्रकुती काल अत्यवस्थ होती. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांचा आवाज बसला होता. त्यामुळे दोन दिवस भाषण करण्यास शरद पवार यांना मनाई केली होती. शरद पवार यांचे आजचेही सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
बारामती लोकसभा मतदार संघाकडे आता सर्व देशाचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे भवितव्य ठरवणार आहे. बारामती मतदान होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी फिल्डींग लावली आहे. आपल्या विश्वासू सरदारांवर जबाबदारी दिली आहे. या पार्शवभूमीवर आजारी असतानाही V फिल्डींग लावली आहे. आपल्या विश्वासू सरदारांवर जबाबदारी दिली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील बुथ केंद्राची जबाबदारी शरद पवार यांनी वाटून दिली आहे. त्यानुसार भोर, वेल्हा, मुळशीची जबाबदारी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर दिली आहे. पुरंदरचा गड आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार आणि संजय जगताप सांभाळणार आहे. इंदापूरमध्ये स्वत: रोहित पवार तळ ठोकरणार आहे. बारामतीची कामगिरी अजित पवार यांचे सख्ख्ये भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांचे पुत्र युगेंद्र पवार पाहणार आहेत. खडकवासला सचिन दोडके यांच्याकडे दिला असून दौंड नामदेव ताकवने पाहणार आहे. तसेच पवार कुटुंबातील सदस्यसुद्धा बूथ यंत्रणा सांभाळत आहेत.
उद्या 7 मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. एकूण 2516 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. 23 लाख 72 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी 13 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे.
