Advertisement
ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींना शिंदे गटाचं प्रत्युत्तर
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना ठाकरे वाद पेटला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाला आहे. मुंबईतल्या घाटकोपर इथं महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांची निवडणूक प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर वादग्रस्त टीका केली. प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेला आता शिंदे गटाने जोरदार प्रत्यत्तर दिल आहे
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यासाठी एक प्रचारसभेत बोलताना प्रियंका चतुर्वेदी यांनी 'एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? अशी घोषणा दिली. यावर समोलच्या गर्दीने 'गद्दार, गद्दार' अशी प्रतिक्रिया दिली.. ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार' असं त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या 'दीवार' सिनेमाचा उल्लेख केला. दीवार सिनेमात अमिताभ बच्चन त्याचा हात दाखवतो, हातावर 'मेरा बाप चोर हैं' असं त्यावर लिहिलेलं असतं, तसंच श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, 'मेरा बाप गद्दार हैं', अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली होती. प्रियंका चतुर्वेदी यांच्या गद्दार वक्तव्यावर नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या संजय निरुपम यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. आदित्य ठाकरे यांच्या कपाळावर लिहिल पाहिजे माझा बाप महा गद्दार आहे. कारण त्याच्या वडिलांनी भाजपासोबत युती तोडून गद्दारी केली, अशी टीका संजय निरुपम यांनी केली आहे. तसंच प्रियंका चतुर्वेदी यांनी माफी मागावी अशी मागणीही संजय निरुपम यांनी केली आहे.
