#

Advertisement

Friday, May 24, 2024, May 24, 2024 WIB
Last Updated 2024-05-24T12:21:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला मोठ्या रक्कमेचे आमिष

Advertisement

पुणे कार अपघातप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट 
पुणे : कार अपघातप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. अल्पवयीन आरोपीचा गुन्हा अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हरला आमिष दाखवल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोर्श कारने जेव्हा दोघांना कारखाली चिरडलं तेव्हा अल्पवयीन आरोपी कार चालवत होता. जमावाने त्याला चोपल्याचंही दृश्यांमध्ये दिसत आहे. मात्र आरोपींकडून कार चालक बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
अल्पवयीन आरोपीच्या वडिलांकडून कार चालक गंगाधर पुजारी याला मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. पोलीस आयुक्तांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. कारण पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी कलम 120 चाही समावेश केला आहे. 
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलीस संबंधित ड्रायव्हरचे कॉल रेकॉर्ड्स तपासणार आहेत. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा हे रेकॉर्ड्स तपासणार आहे. पोलिसांनी ड्रायव्हर पुजारीचे सीडीआर म्हणजे कॉल रेकॉर्ड्स काढले आहेत. 19 तारखेला अपघात झाला त्यावेळी हा ड्रायव्हर त्या कारमध्ये होता का हे सुद्धा पोलीस तपासत आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ड्रायव्हरची कसून चौकशी केली. 

आतापर्यंत 6 आरोपी अटकेत
पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणातील आरोपींना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. आतापर्यंत मुलाचे वडील विशाल अग्रवाल, हॉटेलचा मालक प्रल्हाद भुतडा, हॉटेल व्यवस्थापक सचिन काटकर, ब्लॅक बारचा मालक संदीप सांगळे, हॉटेल कर्मचारी नितेश शेवाणी आणि जयेश गावकर हे 6 आरोपी अटकेत आहेत. आरोपींना पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांना पुन्हा चौकशीसाठी नेण्यात येणार आहेत. याशिवाय मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल आणि ड्रायव्हरचीही आज पुन्हा चौकशी होणार आहे.