Advertisement
मुंबई : हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे. मराठवाड्यात घागरभर पाण्यासाठी करावी लागणारी कसरत शब्दात सांगता येणारी नाही. मराठवाड्यात 1837 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यावरून याची दाहकता लक्षात येईल. हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात गेले आहेत.
धनंजय मुंडे परदेशात
बीड : जिल्ह्यात 434 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. पालकमंत्री धनंजय मुंडे परदेशात आहेत. हिंगोलीमध्ये पाण्यासाठी लोकांची भटकंती, विहिरी तलावांनी तळ गाठलाय. जिल्ह्यातील अनेक गांवांमध्ये टँकर सुरू आहे. पालकमंत्री अब्दूल सत्तार परदेशात आहेत. जालना जिहल्यात सहा मध्यम प्रकल्प कोरडे पडलेत. शहरी आणि ग्रामीण भागात तीव्र पाणीसंकट आहे. जिल्ह्यात 495 टँकर सुरू आहेत. पालकमंत्री अतुल सावे देवदर्शनाला गेले आहेत.
लकमंत्री संजय बनसोडे तिरुपतीला
परभणी : जिल्ह्यातील 8 प्रकल्प कोरडेठाक पडलेत.. अनेक प्रकल्प मृतसाठ्यात गेलेत. पालकमंत्री संजय बनसोडे देवदर्शनाला तिरुपतीला गेलेत. संभाजीनगर - मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. तब्बल 698 टँकरमधून पाणी पुरवठा केला जातोय. पालकमंत्री संदीपान भुमरेंची बैठकीला दांडी. पाणीटंचाईचं संकट गहिरे झाले आहे.
