Advertisement
शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांचा दावा
मुंबई : महाविकास आघाडीने भाजपाला दिल्लीतून बहुमतमुक्त केलं ती महाराष्ट्रातही एकत्रित ताकदीने लढेल, तसंच आम्ही 180 ते 185 जिंकू असा विश्वासही शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना भवनात आज ठाकरे गटाची बैठक सुरु आहे. या बैठकीसाठी जिल्हाप्रमुख, नेते, आमदार, खासदार यांच्यासह मुंबईचे विभागप्रमुखही उपस्थित आहेत. आगामी निव़डणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंकडून त्यांचं मार्गदर्शन केलं जात आहे. भाजपा आणि त्यांच्या इतर मित्रमंडळींना रोखण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींचं बहुमत कमी करण्यात किंवा भाजपाला बहुमतमुक्त करण्यात महाराष्ट्राचं, महाविकास आघाडीचं मोठं योगदान आहे. शिवसेना भवनात आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, नेते, आमदार, खासदार यांची बैठक सुरु आहे. यावेळी संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यासंदर्भात चर्चा झाली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.