#

Advertisement

Friday, June 7, 2024, June 07, 2024 WIB
Last Updated 2024-06-07T12:31:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विधानसभेसाठी शरद पवारांनी आताच 30 उमेदवार केले फायनल

Advertisement

आमदार रोहित पवार यांची माहिती
मुंबई :  लोकसभा निवडणुकीनंतर पुढच्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी आताच 30 उमेदवार नक्कीच केले आहेत. अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या मतदारसंघातील उमेदवार फायनल झाले आहेत, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे. रोहित पवारांचा हा दावा अजित पवारांच्या मंत्र्यांसाठी धोक्याची घंटा आहे. अजित पवार गटातील 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत. येत्या 15 दिवसात दिसेल, असं भाकीत रोहित पवारांनी व्यक्त केलं. आमच्यातील काही लोकं रात्री-बेरात्री जाऊन महायुतीच्या नेत्यांशी सेटिंग करत होते त्यांचे नावं लवकरच जाहीर करणार आहोत. अजित पवार गटातील आमदार शरद पवार गटात येणार हे येत्या 15 दिवसात दिसणार नाही, पुढच्या 15 दिवसात त्यांना निर्णय घ्यावे लागणार, असं मोठं वक्तव्य रोहित पवारांनी केलं.