#

Advertisement

Monday, June 3, 2024, June 03, 2024 WIB
Last Updated 2024-06-03T13:30:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सातपुते 70 हजाराच्या लीडने विजयी होणार ?

Advertisement

भाजपच्या युवा नेत्याने लावला अंदाज
सोलापूर : मोहोळ व पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 2014 व 2019 लोकसभा निवडणुकीत ही काँग्रेसला मताधिक्य मिळाले होते, यामुळे त्या ठिकाणी मिळालेले लीड भाजपला पराभव करण्यासाठी कारणीभूत ठरू शकत नाही मात्र मताचा वाढलेला टक्का व शेवटची तासाभरात झालेले मतदान हे भाजपच्या पथ्यावर पडणार आहे, असा दावा भाजपचे युवा नेते अक्षय अंजीखाने यांनी नेत्याने केला आहे.
सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते या दोन युवा नेत्यांमध्ये झालेल्या लढतीकडे    जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. सोलापूर शहराचा विचार करता तिन्ही मतदारसंघातील शहरी भागात भाजपला 70 ते 80 हजार मताधिक्य मिळणार असून मोहोळ व पंढरपूर मधील काँग्रेसचा लीड हा शहरातील मिळणाऱ्या लीडला तोडू शकणार नाही, 2019 च्या लोकसभेला भाजपचे 2 आमदार होते व यंदा 5 आमदार असल्याने लीड कमी झाले तरी भाजपचा विजय निश्चित असल्याचा अंदाज बांधला आहे.
शहर मध्य विधानसंभा मतदारसंघात पद्मशाली, मोची व तेलगू भाषिक समाज हा भाजपच्या बाजूने उभा राहिल्याने भाजपला मध्य विधानसभा मतदारसंघात 10 हजार पेक्षा जास्त लीड मिळण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ यांची सभा ही मध्य विधानसभा मतदारसंघात लीड मिळण्यास कारणीभूत ठरणार असून संपूर्ण निवडणूकीचे वातावरण हे हिंदुत्वावर आल्याने मध्य मतदारसंघात हिंदू समाज हा एकजुटीने भाजप सोबत उभा राहिला आहे, सा दावा अंजीखाने यांनी केला आहे.