#

Advertisement

Monday, June 3, 2024, June 03, 2024 WIB
Last Updated 2024-06-03T16:56:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात जान्हवीचा सिनेमा फ्री : एका चाहत्याने बुक केले १८ शो

Advertisement

सोलापूर : जान्हवी कपूर हिचा मिस्टर अँड मिसेस माही चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाची तशी चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे. मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटात जान्हवी कपूर ही मुख्य भूमिकेत आहे.सोलापुरातील जान्हवी कपूरच्या चाहत्यांनी 3 दिवसाचे 18 शो बुक केले आहेत. सोलापुरातील नागरिकांना 3 दिवस आता मिस्टर अँड मिसेस माही हा चित्रपट फ्रीमध्ये बघायला मिळणार आहे. जान्हवी कपूरच्या मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटासाठी 6 लाख रुपये खर्च करत 18 शो चाहत्याने चक्क बुक केले आहेत. सोलापुरातील धर्मराज गुंडे, तन्वीर शेख या चाहत्यांनी जान्हवी कपूरसाठी हे शो बुक केले आहेत. सोलापुरातील ई स्क्वेअर टॉकीजमध्ये नागरिकांना 3 दिवस जान्हवीचा चित्रपट फ्रीमध्ये आता बघायला मिळणार आहे.