#

Advertisement

Thursday, June 13, 2024, June 13, 2024 WIB
Last Updated 2024-06-13T11:36:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड

Advertisement

सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना भाजप-शिवसेनेचे नेते गैरहजर 
मुंबई :  राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. तोपर्यंत इतर कुणीही अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. 
दरम्यान महायुतीत अजित पवार एकटे पडले आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षाचा एकही नेता हजर नव्हता. तर केवळ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचेच नेते यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे महायुतीचे अनेक नेते मुंबईत असतानाही, विधानभवनात अर्ज भरण्यासाठी मात्र कुणीच आलं नाही. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.