#

Advertisement

Monday, June 10, 2024, June 10, 2024 WIB
Last Updated 2024-06-10T13:42:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बारामतीत काका-पुतण्यात लढत होणार ?

Advertisement

बारामती : लोकसभा निवडणुकीनंतर आता बारामती विधानसभेची चर्चा आतापासून सुरु झाली आहे. विधानसभेत काका-पुतण्यात लढत रंगणार असल्याचे बॅनर्स लागले आहेत. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्यात लढत होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी प्रथमच मत व्यक्त केले आहे.
बारामती विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार? युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार का? या प्रश्नांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्या आघाडीत जागा वाटप होईल. जागा वाटपात बारामती मतदार संघावर कोण दावा करणार? कोणाचा दावा मजबूत असणार? हे ठरणार आहे. त्यानंतर बारामतीमधून कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार असणार हे ठरणार आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार उमेदवार असणार? यासंदर्भात बॅनर्स लागले. परंतु त्यासंदर्भात आपणास माहीत नाही. मी दिल्लीत होते, असे सुप्रिया सुळे