Advertisement
भाजप लोकनेत्यांना कसं संपवते रोहित पवारांनी सांगितले
मुंबई : भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो अशा शब्दांत, आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. यूज अँड थ्रो ही भाजपाची प्रवृत्ती असल्याचं रोहित पवार म्हणाले. अजित पवार संदर्भात रोहित यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप कडून अजितदादांच्या युज अँड थ्रो होत असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत जास्त यश न मिळाल्याने केंद्रातील मंत्रीपदाबाबत अजित पवार गटांमध्ये अस्वस्थता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रातून अजितदादांमुळे भाजपच्या प्रतिमेबाबत केलेले लिखाण. तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेा उमेदवारी दाखल केला तेव्हा कुठलाही भाजपचा नेता उपस्थित नव्हता. निकालानंतर काही दिवसातच शिखर बँकेच्या प्रकरणाबाबत क्लोजर रिपोर्ट ला दिलेला आव्हान यावरून भाजप कडून अजितदादांचं राज्यातील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नेत्यांना समजेल का? असा प्रश्न असल्याच देखील रोहित पवार यांनी म्हटल आहे.
