#

Advertisement

Thursday, June 13, 2024, June 13, 2024 WIB
Last Updated 2024-06-13T12:56:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवारसाहेब इंदापूरचा आमदार बदला..

Advertisement

इंदापूर तालुक्यातील नागिरीकांची मागणी: दत्तात्रय भरणे यांना टेन्शन 
इंदापूर : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार सध्यास्थानिक पातळीवरची परिस्थिती काय आहे? याचा आढावा घेत आहेत. बारामती, पुरंदर नंतर शरद पवार हे इंदापूर तालुक्यात आहेत. इंदापूरमधील निरवांगी या गावात शरद पवार सध्या आहेत. यावेळी स्थानिकांनी शरद पवार यांच्यापुढे एक मागणी केली. शरद पवारसाहेब आमचा आमदार बदला…. आप्पासाहेब जगदाळे यांना आमदार करा. कारण इंदापूरचा आमदार बदलल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी मागणी स्थानिकांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.
शरद पवारांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर पवारांनी त्यांच्याशी संवाद साधला. सरकारला अनुदान द्यावेच लागेल. नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी रस्त्यावर उतरायला तयार आहे. नाहीतर 4-6 महिने थांबा. कारण मला सरकार बदलायचे आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचे आहेत. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार, असं शरद पवार म्हणाले.