Advertisement
बीडमधील पराभवानंतर पुन्हा जनसंपर्क वाढवण्याचा निर्णय
बीड : राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल लागला आहे. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा दारुण परभाव झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना परभवाची धूळ चारली. बजरंग सोनवणे यांनी 6हजार585 मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बीडमधील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी घेतला मोठा निर्णय घेतला आहे.
बीड हा गेली 15 वर्षं भाजपचा गड आहे. तरीही पंकजा मुंडे यांना भाजपतर्फे उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणे यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंची साथ सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावरुन बजरंग सोनवणे यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.
दरम्यान, पुन्हा जनसंपर्क वाढवण्याचा निर्णय पंकडा मुंडे यांनी जाहीर केला आहे. पक्षाच्या बैठका असल्याने मी मुंबई, दिल्लीला जाईल, त्यानंतर मी 12 किंवा 15 तारखेपासून आभार दौरा करणार आहे. तुमच्या सर्वांपर्यंत मी येणार आहे. तुमचे आभार मानण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी. संघर्ष हा आपल्या जीवनात पाचवीला पूजला आहे. या संघर्षात न घाबरता आपण जो लढा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मला खूप खूप अभिमान वाटतो असंही पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.
