#

Advertisement

Saturday, June 22, 2024, June 22, 2024 WIB
Last Updated 2024-06-22T12:25:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

संधी मिळाली तर स्रिया देखील कर्तुत्व दाखवतात !

Advertisement
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा 

पुणे : कर्तुत्वाचा मक्ता हा फक्त पुरुषांकडे नसतो. संधी मिळण्याची आवश्यकता आहे. संधी मिळाली तर स्रिया देखील कर्तुत्व दाखवतात. हे आज सिद्ध झाले आहे, असा उल्लेख करीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.}
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात यशस्विनी सन्मान सोहळा 2024 पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. शरद पवार यांनी महाराष्ट्रात लागू केलेल्या महिला धोरणांची तीन दशके या आढावात्मक पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या तर्फे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आई शारदाबाई पवार यांच्यासोबतच्या आठवणींना शरद पवार यांनी उजाळा दिला आहे.
माझे शिक्षण लहान गावात झालं. आम्ही सात भाऊ आणि चार बहिणी आमच्या घरात सगळ्यात शिकलेली व्यक्ती माझे सर्वात वरिष्ठ बंधू…. पाचवीपर्यंत शिक्षण गावाकडे घेतल आणि नंतरच शिक्षण घ्यायला पुण्यात आलो. आई सकाळी डबा द्यायची आणि सकाळी सात वाजता एसटीने डबा यायचा. स्वारगेटला मी जाऊन डबा घेऊन यायचो अन् मग आमचं जेवण व्हायचं. असे ते दिवस होते, असं शरद पवार म्हणाले.
आम्ही अभ्यास करतो का नाही, पाहायला आई कॉलेजला यायची. तिथं येऊन प्राध्यापकांना विचारायची की हा अभ्यास करतो का?, असं आईने आम्हाला सगळ्यांना शिकवलं, असं शरद पवार यांनी सांगितले.